मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

॥फर्स्ट पोस्ट॥

फुलवेडा सातपुडा !

तोरणमाळच्या पर्वतरांगांत आणि सातपुड्याच्या कुशीत विसावलेल्या फुलांचे रंगवैभव तसे प्रत्येक ऋतूत वेगळे असते. पडत्या पावसातल्या तोरणमाळचे दर्शन घेताना सातपुड्याची सारी हिरवाई थेट डांबरी रस्त्यांवर उतरलेली असते. मात्र अंगावर पाऊस झेलणारा सातपुडा एका ध्यानस्थ योग्यागत हिरवा शेला पांघरून पावसाचे अनवट संगीत ऐकण्यात आणि भोगण्यात मग्न झालेला असतो. पावसाची पावले श्रावणाकडे झुकतात , तेव्हा मात्र या हिरवेपणाला एक नवा आयाम मिळतो आणि त्यानंतर सुरू होणारे ऋतुचक्र थेट माघ,फाल्गुनापर्यंत अविरत सुरू राहते. पानगळींचे दिवस असले तरी सातपुडा फुलत असतो. फुलत राहतो. 🔺🔺 🔺 🔺 🔺 तो रणमाळच्या गोरक्ष कुटी विश्रामगृहातील एक सूर्यस्नात सकाळ. सातपायरी घाट ओलांडून जंगलात प्रवेश केला , तेव्हा पावसाळ्यातला उमदा हिरवाकंच सातपुडा रंगवैभवात दरवळत होता. फुलपाखरांचे थवे झाडाझुडपांशी खेळ मांडून आपल्या विविध रंगसंगतीचे मनोहारी दर्शन देत बागडत होते. या फुलपाखरांत फिक्कट पिवळ्या रंगांच्या छोटेखानी पतंगांचा भरणा अधिक. कृमी-कीटकांचे विश्व सजीव झालेले अन् रानझेंडूंचे ताटवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेले....

नवीनतम पोस्ट

सातपुड्याच्या माथ्याला, ‘अश्वत्थामा'च्या यात्रेला !